Home महाराष्ट्र नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ – अजित पवार

नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ – अजित पवार

VidhanSabha Election 2023 : भाजप चार पैकी तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर.

VidhanSabha Election 2023 Result in Ajit Pawar Statement

Ajit Pawar News: देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळताना दिसून येत आहे. आतापर्यंतच्या मतमोजनीनुसार भाजप चार पैकी तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे.

भाजपच्या या विजयावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.

निवडणूक निकालाची सुरुवातीची परिस्थिती:

मध्य प्रदेश – १६५ जागांवर भाजपची आघाडी, काँग्रेस ६२ मतदारसंघात आघाडीवर

राजस्थान – भाजप – १०९ आणि काँग्रेसची ७२ जागांवर आघाडी

छत्तीसगड – भाजप ५३ आणि काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर

तेलंगणा – बीआरएस ४१, काँग्रेस ६४ आणि भाजप ९ जागांवर आघाडीवर

अजित पवार यांनी म्हटलं की, तेलंगणामधील केसीआर राव महाराष्ट्रात फिरले. देशाच्या सगळ्या टीव्ही चॅनेलवर जाहिराती दिल्या. आताच्या निकालावरुन त्यांची परिस्थिती बिकट आहे.  मध्यप्रदेश , छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही भागात भाजपचाच विजय होईल, असं चित्र आहे. आम्ही घेतलेली भूमिका काहीना आवडली नाही. पण कोणी काही म्हटलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशिवाय पर्याय नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

Web Title: VidhanSabha Election 2023 Result in Ajit Pawar Statement

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here