संगमनेर तालुक्यात गारांचा, अवकाळी पाउस, शेतमाल उध्वस्त
Sangamner rain: संगमनेर तालुक्यातील पठारभागात विजेच्या कडकडाट अवकाळी पाऊस, गावांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढले.
संगमनेर: गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील पठारभागात विजेच्या कडकडाट अवकाळी पाऊस पडत आहे. रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारीही अनेक भागात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पठारभागातील डोळासणे, कर्जुले, पिंपळगाव देपा, सारोळे पठार गावांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला होता. बोराच्या आकाराच्या गाराने परिसर पांढराशुभ्र झाला होता. तालुक्यात मागच्या आठदिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. पावसाने रब्बी पिकाचं मोठं नुकसान केलं असल्याची चित्र दिसत आहे.
या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील फळबाग उध्वस्त झाल्यात तसेच गहू, हरभरा, भाजीपाला, प्रचंड नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शनिवारी दुपारीनंतर अचानक झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली असल्याचं चित्र पठारभागातील अनेक भागात पाहायला मिळत आहे. डोळासणे, कर्जुले, पिंपळगाव देपा, सारोळे पठार, वरुडी पठार, गुंजाळवाडी गावांमध्ये शेकडो एकर शेतमालासह डाळिंबाच्या बगीचा गारपीटीमुळे उद्धवस्त झाला आहे.
Web Title: Unseasonal hailstorm Rain in Sangamner taluk, crops destroyed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App