अहमदनगर ब्रेकिंग: दोन पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात
Breaking News | Ahmednagar: पोलीस ठाण्यात बारा हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.
कोपरगाव: पोलीस ठाण्यात बारा हजार रुपयांची लाच घेताना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पो. हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. गुरुवार दि.७ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे कोपरगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या संदर्भात एक गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे याच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी तक्रारदार याने पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर याला भेटून माझ्याकडे ये, असे सांगितले असता तो कोतकर यांना भेटला. कोतकर यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाचेची रक्कम ठरली व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथील कक्षात स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी, पो. ना. विलास निकम यांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी लाचखोर पोलीस कर्मचान्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Two policemen in the net of bribery
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study