नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक
Breaking News | Ahmednagar: नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक व दीडशे कोटींच्या घोटाळ्यात बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.
अहमदनगर: जिल्ह्यातील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले. आंदोलकांनी देखील विविध आंदोलने करत प्रशासनास धारेवर धरले. आता नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक व दीडशे कोटींच्या घोटाळ्यात बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे.
शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया (रा. नगर) व शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील (रा.नगर) अशी अटक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.
बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे.
तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आलेले आहे. त्याचा अहवालही आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर झालेला आहे. यात दोषी संचालक, कर्जदार व अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीनंतर लुनिया व पाटील यांना अटक करण्यात आली. कर्जमंजुरी प्रकरणात त्यांच्यावर ठपका असल्याचे उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले. या दोघांच्या अटकेनंतर आता इतरांचेही धाबे दणाणले आहेत.
Web Title: Two officers arrested in connection with Nagar Urban Bank scam
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News