अहमदनगर ब्रेकिंग: दोन अल्पवयीन मुलांनी केला कामगाराचा खून
Ahmednagar Murder: चहाच्या टपरीवर काम करणार्या एका कामगाराचा खुन केल्याची धक्कादायक घटना.
अहमदनगर: दोन अल्पवयीन मुलांनी चहाच्या टपरीवर काम करणार्या एका कामगाराचा खुन केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली. संजय छगन लिमगिरे (वय 48 रा. नगर) या कामगाराचा खुन झाला आहे. संजय यांचा पुतण्या सतिष राजू लिमगिरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात देखील घेतल्याची माहिती हाती आली आहे. 30 ऑक्टोबरच्या रात्री दोन अल्पवयीन मुलांनी दगडाने व लाकडी दांडक्याने संजय लिमगिरे यांना डोक्यात दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेले संजय लिमगिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Two minors Murder a worker
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App