Home संगमनेर संगमनेर: दोन मुली व एक मुलगा पालकांनी बेवारस सोडून फरार

संगमनेर: दोन मुली व एक मुलगा पालकांनी बेवारस सोडून फरार

Two daughters and a son are left unattended by their parents

Sangamner | संगमनेर: तीन मुलांना जन्मदात्या माता पित्याने संगमनेरात बेवारस सोडून दिले. दोन मुली व एक मुलाचा यात समावेश आहे. ही मुले शहरातील इंदिरानगर परिसरात मंगळवारी सायंकाळी मिळून आली. मुलांना ताब्यात घेत शहर पोलिसांनी अज्ञात पालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

तीनही मुले नाशिक पुणे महामार्गावर रडत बसल्याचे काही मागारीकांच्या निदर्शनास आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांना काही सांगता आले नाही. पोलिसांना माहिती देण्यात आली. कॉन्स्टेबल अमित महाजन यानी या मुलांना पोलीस ठाण्यात आणले. आई वडिलांचे नाव व पत्ता विचारण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मुलं घाबरलेली होती. त्यांना भाषाही समजत नव्हती. पोलिसांनी त्यांना मायेचा आधार देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. महाजन यानी मुलांना नवीन कपडे आणले. २० वर्षाच्या मुलीला स्वयंप्रेरित संस्थेत तर ६ वर्ष मुलीला व ४ वर्ष मुलाची राहण्याची व्यवस्था प्रियदर्शनी आदिवासी मुलाच्या वसतिगृहात करण्यात आली. तीनही मुलांना नगरच्या स्नेहालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Two daughters and a son are left unattended by their parents

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here