Home अकोले अहिल्यानगर: ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण ठार

अहिल्यानगर: ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण ठार

Breaking News | Ahilyanagar Accident:  ओव्हरटेक करताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार.

One person was killed in a collision with a tractor Accident

श्रीरामपूर : ओव्हरटेक करताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना अशोकनगर ते कारेगाव रस्त्यावर घडली. भीकन हुसेन बैलिम (वय ७४) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भीकन हुसेन बैलिम व त्यांचा थाऊ दोघे पाहुण्याकडे दहाव्यासाठी गेले होते. पुन्हा अशोकनगरकडे येत असताना सायंकाळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना ट्रॉलीची धडक दुचाकीला लागल्यामुळे भीकन बैलिम हे दुचाकीवरून खाली पडले. त्यांना ट्रॅक्टरने १५ ते २० फूट फरफटत नेले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: One person was killed in a collision with a tractor Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here