Home अहमदनगर Ahmednagar | नगरमधून धावली राज्यातील पहिली ई-बस शिवाई- E Bus

Ahmednagar | नगरमधून धावली राज्यातील पहिली ई-बस शिवाई- E Bus

Shivai, the first e-bus in the state to run from the city

अहमदनगर | Ahmednagar: आज १ जून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापन दिनानिमित्त राज्यातील तमाम प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

राज्यातील पहिली ई-बस (E Bus) शिवाई आज नगरमधून धावली आहे. राज्यातील पहिली एसटी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. याच मार्गावर पहिली विद्युत बस अर्थात ‘शिवाई’ धावली आहे.

शिवाई ई-बसचा शुभारंभ एसटीचे पहिले वाहक नगरमधील लक्षमणराव केवटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार ,निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, विभाग नियंत्रक विजय गीते, शिवाई ई -बसचे वाहक जयदेव हेंद्रे व चालक गणेश साबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Shivai, the first e-bus in the state to run from the city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here