Home जळगाव महिलेवर लैंगिक अत्याचार अन ब्लॅकमेलिंग

महिलेवर लैंगिक अत्याचार अन ब्लॅकमेलिंग

Breaking News | Jalgaon Crime: अत्याचाराचे मोबाईल शूटिंग करून ब्लॅकमेल करत चार लाखांचे दागिने बळकाविल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक.

Sexual assault and blackmailing of women

जळगाव: महिलेवर हॉटेल मधील अत्याचाराचे मोबाईल शूटिंग करून ब्लॅकमेल करत चार लाखांचे दागिने बळकाविल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. भूषण नीलेश पाटील (रा.खेडी,ता.जळगाव) असे संशियीत आरोपीचे नाव आहे.

संशयित भूषण पाटील याने पिडीतेला हॉटेल कमल पॅराडाईज येथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत त्याचे मोबाईल शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देत सतत अत्याचार करून तब्बल चार लाखाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले.

म्हणणे ऐकले नाहीतर, तूला ठार मारीन अशा धमक्या दिल्या जात असल्याचा पिडीतेचा आरोप आहे. त्रास असाह्य झाल्यानंतर पिडीतेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर संशयिताविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहे.

संशयित भूषण पाटील याने लैंगिक अत्याचारानंतर शूटिंग करत ब्लॅकमेलिंग केलेच, पण पिडीतेला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जागतिक प्रेम दिवस म्हणून साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन-डे च्या दिवशीच तिच्यावर अत्याचार करीत शुटींग करुन चौदा दिवसांपासून त्रास देत असल्याचे  तपासात समोर आले आहे.

Web Title: Sexual assault and blackmailing of women

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here