संगमनेर: १४०० किलो गोमांससह दोन वाहने पकडली
Sangamner Crime: १४०० किलो गोमांससह दोन वाहने पकडली, कारवाईत एकूण दहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त.
संगमनेर: शहरात छुप्या पद्धतीने बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. संगमनेर शहर व तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत १४०० किलो गोमांससह दोन वाहने पकडली असून एकूण १० लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुज्जफर जाकीर हुसेन कुरेशी वय वर्षे (२८) रा.दादामिया इस्लामी चाळ, कुरेशी नगर कुर्ला (पुर्व) मुंबई, असलान अस्लम कुरेशी वय वर्षे (२२) रा.अल्ताफ बिल्डिंग रूम नं सहा कब्रस्थान रोड कुरेशी नगर, कुर्ला (पुर्व) मुंबई हे दोघेजण (एमएच ०४ एचवाय ४०८२) या वाहनामधून बेकायदेशीर गोवंश जनावरांचे कत्तल केलेले मांस घेवून जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी हे वाहन शुक्रवारी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील कर्हे फाटा येथे पकडले आहे. दोन लाख पन्नास हजारांचे एक हजार किलो गोमांस व चार लाखांचे वाहन असा एकूण सहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पोलिस शिपाई बाबासाहेब शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसर्या कारवाईत शहर पोलिसांनी खराडी वस्ती येथे चारशे किलो गोमांस घेवून जाणारे वाहन पकडले आहे. ८० हजार रूपये किंमतीचे चारशे किलो गोमांस व दोन लाख रूपये किंमतीचे वाहन असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान शहर पोलिस व तालुका पोलिस यांनी केलेल्या कारवाईत एकूण दहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस काॅन्सटेबल अनोळखी वाहनचालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner Two vehicles with 1400 kg of beef seized
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App