संगमनेर तालुक्यात आज सकाळीच पाच पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात करोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरासह ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यात एकविसावे शतक पूर्ण झालेले आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन ग्रामीण भागात काही उपाययोजना आखणार आहेत का याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. दररोज पन्नास पेक्षा अधिक रुग्ण तालुक्यात आढळून येत आहे. ही एक तालुक्यासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या काही प्रमाणत कमी होताना दिसत आहे. पण ग्रामीण भागात करोनाने जोर धरला आहे.
संगमनेर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी २५ करोनाबाधित आढळून आले होते. तर आज सकाळीच आणखी पाच पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे.
आज प्राप्त अहवालात गुंजाळवाडी येथील ३७ वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी येथे एक ७५ वर्षीय, ढोलेवाडी येथे ४८ वर्षीय पुरुष, कौठे बुद्रुक येथे ६२ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला असे पाच करोनाबाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka today five infected