संगमनेर: कैद्यांकडून पोलिसांना जीवे मारण्याची धमकी
Sangamner News: कैद्यांनी बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना.
संगमनेर: येथील उपकारागृहातील कैद्यांनी बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला.
संगमनेर उपकारागृहात कैदी मोठ्याने आरडाओरडा करीत होते. त्यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल गोडे व राजेंद्र बांधे यांनी कारागृहातील बरॅकसमोर जाऊन त्यांची विचारपूस केली असता, विशाल अशोक कोते, अजबे, पारधे यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच या आरोपींनी पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे याबाबत पोलीस नाईक राजेंद्र बांधे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner Prisoners threaten to kill police
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App