संगमनेर: सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, सासरच्या मंडळीवर गुन्हा
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. यावरून संगमनेर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेश्मा रुपेश मोकळ वय २४ वर्ष रा, पारेगाव खुर्द या विवाहितेने आत्महत्या केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विवाहितेच्या वडिलांनी कचरू लहानू वाकचौरे वय ५२ रा, धांदरफळ संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीनुसार मुलगी रेश्मा हिचा विवाह दि. २९/०९/२०२० रोजी पारेगाव ता. संगमनेर येथील रुपेश सुखदेव मोकळ याच्याशी बुद्ध धर्म पद्धतीने काटवन मळा धांदरफळ बुद्रुक ता. संगमनेर येथे झाला. लग्नाचा संपूर्ण खर्च मी केला असून लग्नात मुलीला प्रापंचिक सामान भांडी कुंडी फर्निचर असे दिले. विवाह झाल्यानंतर मुलगी रेश्मा ही पारेगाव बुद्रुक येथे नांदावयास गेली. तिच्या घरात तिचा पती रुपेश सुखदेव मोकळ सासू सुरेखा सुखदेव मोकळ सासरा सुखदेव नारायण मोकळ भाया अमोल सुखदेव मोकळ जाव मनीषा अमोल मोकळ असे एकत्रित राहत असून ते शेतीचे तसेच विहिरीचे कामे मजुरीने करतात. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांची शेती कामासाठी कर्जाने जुना ट्रकटर खरेदी केला आहे. मुलगी रेश्मा हिस लग्न झाल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी चांगले नांदवले नंतर नोव्हेंबर २०२० दिवाळी झाल्यानंतर १० दिवसांनी रेशमाचा सासरा सुखदेव मोकळ व त्याच्या बरोबर एक इसम असे मी कारखान्यावर काम करीत असताना माझ्याकडे आले व आम्हाला रोटाव्हीटर घ्यायचे आहे. असे म्हणून ५० हजार रुपयांची मागणी केली. नाहीतर तुमच्या ओळखीच्या दुकानातून घेऊन द्या असे ते म्हणाले त्यावर माझे ओळख म=नाही असे म्हणून मी त्यांना ५ हजार रुपये दिले. व तुम्ही रोटाव्हीटर घेऊन टाका असे त्यांना सांगितले. नंतर १० ते १५ दिवस मुलगी रेश्मा हिला चांगले नांदवले नंतर माहेरवरून हुंडा आणावा यासाठी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तू पसंत नाही. लग्नात तुला माहेरच्यांनी सोने नाणे दिले नाही असे म्हणून तिचे सासरचे नवरा रुपेश, सासरा सुखदेव सासू सुरेखा भाया अमोल हे तिचा छळ करू लागले. याबाबत मुलीने माझ्या कुटुंबियांना वेळोवेळी याबाबत माहिती दिली मी व माझे कुटुंबीयांनी त्यांची समजूत घातली. परंतु रेश्माच्या सासरच्यांनी तिला त्रास देणे चालूच ठेवले. रेशमाची आजी सासू घरचे संडास वापरू देत नव्हते. त्यासाठी तिला शेतात जावे लागे. आम्ही तिच्या सासरच्या लोकांशी वेळोवेळी समजूत घालून तिला संडासात जाऊ द्या नाहीतर वेगळी व्यवस्था करून द्या असे समजावून सांगितले होते. दिनांक २७/१२/२०२० रोजी रेश्माची नणंद रंजना सचिन शेळके रा. श्रीरामपूर ही तिच्या माहेरी पारेगाव बुद्रुक येथे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करिता आलेली होती. त्यावेळी नणंद ही रेश्मा हिस म्हणायची की तू माझे कपडे धूत नाही. काम करीत नाही असे त्यावरून रेशमाचे सासरचे लोक रेशमाला आणखी त्रास देऊ लागले. रेशमाने फोन वरून सांगितल्याने दिनांक २/१/२०२१ रोजी माझा मुलगा संदीप हा रेशमाला घेऊन माहेरी धांदरफळ बुद्रुक येथे घेऊन आला. रेश्मा आठ दिवसांनी ११/०१/२०२१ रोजी मी रेश्माला तिचे सासरी नेऊन घातले. त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांची समजूत घातली. आमची परिस्थिती बेताची आहे. हुंडा देण्याची आमची ऐपत नाही. असे सांगितले असता आम्हाला ट्रकटरचे हप्ते भरायचे आहे. त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. याच कारणावरून रेश्मा हिस तुला स्वयंपाक करता येत नाही तू पटकन कामही करत नाही असे टोचून बोलून तिला शिवीगाळ दमदाटी करून तिला उपाशी पोटी ठेऊन मारहाण करत होते. माझा मुलगा संदीप रेश्माळा भेटण्यासाठी गेला. घरी गेल्यावर तिची जाव आजी सासू घरी होते. खाण्यासाठी पाववडे नेले होते. तेव्हा रेशमाच्या जावेने पाणी देऊन सरबत केले व पाववडे सगळ्यांना दिले. मी अर्धा तास थांबून तिची विचारपूस केली व घरी आलो.
रात्री साडे आठच्या सुमारास जावई रुपेश याने मुलगा संदीप याला फोन केला की तुझी बहिण दुसऱ्याच्या फोनवरून माहेरी फोन करते. त्यावेळी मुलाने जावयाशी फोनवरून समजूत घातली. साडे नऊ च्या सुमारास माझे व्याही सुखदेव मोकळ यांना फोन केला व का भांडता मुलीला का त्रास देता असे करायचे असेल व नंदावयाचे नसेल तर माझ्या मुलीला माहेरी आणून घाला असे म्हणालो. व्याही म्हणाले तुम्ही आले तर तुमची मुलगी पाठवून देऊ असे म्हणाले. त्यानंतर सकाळी पाहू असे म्हणाले. १६/०३/२०२१ रोजी सकाळी सात वाजता रेशमाने तिच्या नवऱ्याच्या फोनवरून फोन करून मला सासरचे लोक त्रास देत आहे. त्यावर मी तिची समजूत घालून दोन तीन दिवसांत घ्यायला येतो असे सांगितले. सकाळी ९ वाजता माझी पत्नी संगीता हिला रेशमाने फोन करून सांगितले. माहेरच्यांनी हुंडा दिला नाही असे म्हणून शिवीगाळ केली व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली असे सांगितले. सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी जावई रुपेश याने फोन करून तुम्ही पारेगावला या असे सांगितले. मी आता दिवस मावळला आहे उद्या येऊ असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता रुपेश याचा पुन्हा फोन आला तुम्ही पारेगावला याच तेव्हा मी व मुलगा संदीप असे मोटारसायकलवरून आठ वाजता पारेगावला गेलो. तेथील लोक बटरीने काहीतरी शोध घेत होते. तेथे विचारपूस करता त्यांनी माझी मुलगी रेश्मा ही दुपारी अडीच वाजल्यापासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यावेळी रेशमाच्या सासूने आम्हाला विहिरीकडे जा असे म्हणाली. आम्ही पण तिचा शोध घेत ओळखीच्या सानप वस्तीवर चौकशी केली तर रेश्मा तेथे आली नसल्याचे सांगितले. आम्ही दोन तास शोध घेतला. नंतर गावकऱ्यांनी आम्हाला विहिरीजवळ रेशमाची चप्पल व बांगड्या आढळून आल्या. असे सांगितले. विहिरी धोक्याची असल्याने मी व मुलगा घरी आलो. १७ मार्च २०२१ सकाळी सात वाजता आम्ही पुन्हा नातेवाईक सोबत पारेगाव येथे गेलो. भाऊसाहेब नारायण मोकळ रा. पारेगाव यांच्या विहिरीत शोध घेतला. विहीर खोल व पाण्याने भरलेली असल्याने गावकर्यांच्या मदतीने विहिरीतील पाणी मोटारीद्वारे उपसून शोध घेतला असता रेश्मा ही दोन वाजता पाण्यात बुडालेली मिळून आली. तिला वर काढून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला मयत घोषित करण्यात आले.
रेश्मा रुपेश मोकळ वय २४ वर्ष रा, पारेगाव खुर्द हिचा विवाह २४/०९/२०२० रोजी झाले नंतर तिच्या सासरकडील मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने रुपेश सुखदेव मोकळ, सुखदेव नारायण मोकळ, सुरेखा सुखदेव मोकळ, अमोल सुखदेव मोकळ सर्व रा, पारेगाव खुर्द, रंजना सचिन शेळके रा. श्रीरामपूर यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे करीत आहे.
Web Title: Sangamner married woman jumped into the well and committed suicide