Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास

Sangamner Crime Sexually Abuse of a minor girl

संगमनेर | Sangamner Crime: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला वेगवेगळे आमिष दाखवून तसेच फूस लावून पळवून नेऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार (Sexually Abuse) केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी आरोपीला वेगवेगळ्या कलमानुसार १० वर्षाचा सश्रम कारावास व १६ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. आज तब्बल सात वर्षांनी निकाल दिला आहे. सदर घटना ही २०१५ साली घडली होती.

१९ मे २०१५ रोजी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी संतोष अशोक वाडेकर रा. लक्ष्मीनगर ता. संगमनेर याने १५ वर्षीय मुलीला फूस लावून घरातून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष वाडेकर याच्याविरोधात ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सदर मुलीचा तपास करून पोलीस ठाण्यात हजर केले होते. पोलीस उप निरीक्षक यांनी तपास करून पिडीत मुलीच्या जबाबावरून आरोपीवर पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने ९ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील भानुदास कोल्हे यांनी युकिवाद करत न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरविले.  

Web Title: Sangamner Crime Sexually Abuse of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here