Home क्राईम संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangamner Crime Illegal sand extraction

संगमनेर | Sangamner Crime: संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैध वाळू उपसा सुरु असून माहुली परिसरात माहुली परिसरात माहुली ते हिवरगाव पठार रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा आयशर टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या आयशरमध्ये तीन ब्रास वाळूसह जप्त करण्यात आले आहे. सुमारे १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यावरून तालुक्यात महसूल विभागाचे वाळू उपशाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील साकुर येथून हिवरगाव पठार ते माहुली या रस्त्याने अवैध वाळू वाहतूक करणारा आयशर जाणार असल्याची माहिती घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळाली. त्यानुसार रविवारी सायंकाळी विना क्रमांकाचा अवैध वाळूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. चौकशी केल्यानंतर कोणताही प्रकारचा वाळूचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश बाळासाहेब वराळे रा. साकुर ता. संगमनेर याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल आर. व्ही. खेडकर करीत आहे.

Web Title: Sangamner Crime Illegal sand extraction

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here