संगमनेर: अधिकारी असल्याचा बनाव करत हॉटेल चालकास लुटले
संगमनेर: तालुक्यातील शिबलापूर संगमनेर रस्त्यावर असलेल्या शेडगाव शिवारात हॉटेल न्यू कॉर्नरच्या मालकास तीन तोतया अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सुनील माधव फड यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pretending to be an officer he robbed)
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दिनांक २८ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मी व माझा भाऊ अनिल हे आमच्या हॉटेलसमोरील अंगणात बसलो होतो, त्यावेळी तेथे महिंद्रा एसयुव्ही एम,एच. १५ जीआर ६८८७ ही गाडी आली. त्या गाडीतून आलेल्या तिघांनी आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे सांगत तुमचे हॉटेल उघडा, आम्हाला रेकार्ड चेक करायचे आहे. हॉटेल उघडल्यावर हॉटेल का उघडले असे त्यातील एक जण म्हणाला. हॉटेल बंद असून तुम्ही उघडा म्हंटल्याने मी उघडले. असे सांगितल्यावर दुसऱ्याने लॉकडाऊन असल्याने हॉटेल चालू असल्याने परमीट रद्द करण्याची धमकी दिली. असे करू नका असे म्हणताच त्या व्यक्तीने मला बाजूला घेऊन २५ हजार रुपयांची मागणी केली. मी घाबरलो असल्याने २५ हजार आणून त्या व्यक्तीच्या हातात दिले. यावेळी त्याच्याबरोबर दोन व गाडीत दोन व्यक्ती बसलेले होते. माझ्याकडून पैसे घेऊन घाईघाईने ते जात असल्याने मला त्यांचा संशय आला. मी त्यांना थांबण्यास सांगितले. परंतु ते आवाज न ऐकताच गाडीत बसून निघून गेले. त्यामुळे मी व माझा भाऊ यांनी दुचाकीवरून पाठलाग केला. आश्वी बुद्रुक येथील पेट्रोल पंपावर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते कट मारून धूम निघून गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. अवघ्या काही तासांत पोलिसांनी भीमराव वाघमारे व रामेश्वर शिंदे रा. ता. सिन्नर या दोघांना अटक केली आहे.
Web Title: Pretending to be an officer he robbed the hotel driver