Rape: अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार, तरुणास अटक
Rape: अल्पवयीन मुलीबरोबर वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.
पुणे: घराजवळ राहणाऱ्या एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध (Sexual relation) ठेवणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
मंगेश ऊर्फ नन्या सुनिल चिखलकर (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका नागरिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २४६/२२) दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षाची पुतणी हिला फुसलावून मंगेश याने स्वतःच्या घरात नेले. ती अनुसुचित जाती जमातीची व अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. पोलिसांनी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार अधिक तपास करीत आहेत.
Web Title:- Rape of a minor girl in Pune Dattawadi
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App