संगमनेर: बनावट नोटा प्रकरणी रजनीकांतला पाच दिवसांची कोठडी
Breaking News | Sangamner: मदतीने देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. यात नऊ जणांना अटक.
संगमनेर: बाहेरील देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून एक वेगळा कागद मोठ्या प्रमाणावर भारतात येतो. परंतु हा कागद कोण आणि कशासाठी मागवत आहे याची चौकशी केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकाने केली असता धक्कादायक माहिती समोर आली. भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्यासाठी हा कागद वापरला जाणार असल्याची खात्री पटल्याने केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. यात नऊ जणांना अटक करण्यात आले आहे. त्यात संगमनेरातील गुंजाळवाडी येथील छाप्याचा देखील समावेश आहे. यात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुरुवारी रोजी राज्यातील संगमनेर, कोल्हापूर तर हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. देशभरात टाकलेल्या ११ छापांमध्ये सात ठिकाणी बनावट चलनी नोटा छपाई सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संगमनेरमध्ये गुंजाळवाडी येथील रजनीकांत रहाणे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला तर कोल्हापूरमध्ये दोघांना पथकाने अटक केली.
त्यांच्याकडून काही बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याची साहित्य जप्त करण्यात आले आहे. गुंजाळवाडीत पकडण्यात आलेल्या राहणे याने हाय सेक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपरचा वापर करुन एच पी कंपनीचा मॉडेल नं. Smart Tank 585 All in One printer Sr-No-TH4608WOXR या प्रिंटरचा वापर करुन भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्याचा प्रयत्न केला होता.
बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणावर हाय सिक्युरिटी आरबीआय ट्रेड पेपर (खोट्या नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा) भारत सरकारची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान करत डीटीडीसी या कुरिअर कंपनीमार्फत देशभरात पाठवण्यात आल्याची तसेच अलिबाबा या वेबसाईटवरून हा पेपर संबंधितांनी मागविल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Web Title: Rajinikanth jailed for five days in fake currency case