तृतीय वर्धापनदिना निमित्त भव्य बॉयलर अटेंडंट कामगार मेळावा
महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेचा तृतीय वर्धापनदिना निमित्त भव्य बॉयलर अटेंडंट कामगार मेळावा.
महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेचा तृतीय वर्धापनदिना निमित्त भव्य बॉयलर अटेंडंट कामगार मेळावा शुक्रवार वार दि.२१ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता कै भिकोबा तांबे सभागृह बारामती या ठिकाणी संपन्न झाला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स.तु बधे (मा.सहसंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य ) यांनी भूषविले तर उदघाटक उ.शं.मदने(मा.सहसंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य ) यांनी यांनी स्वीकारले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन, प्रतिमा पुजन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या सत्कार संघटनेचे अध्यक्ष अंकुश वाकचौरे व संघटनेचे उपाध्यक्ष ताराचंद चव्हाण यांनी केला. तसेच कार्यक्रमाचे उदघाटक यांच्या सत्कार संघटनेचे सहसचिव शशिकांत पवार व संघटनेचे कार्याध्यक्ष खान साहेब यांनी केला. विशेष अतिथी गजानन चौगुले साहेब, यांचा सत्कार आनंदराव शेळके, पोपट मोठे यांनी केला.
तसेब प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व्ही आर बॉयलर बारामती संचालक राजाराम सातपुते साहेब,शिवम सेल्स अँड सर्व्हिसेस बारामती संचालक अशोक लोखंडे साहेब, मराठा इंटेलिजन्स सिक्युरिटीचे बारामती संचालक प्रवीण जगताप साहेब, प्रिव्हेनज बिकसन्स बॉयलर्स विमाननगर,
एस्बी पावर सोल्युशन प्रा लि इंदापूर प्रशांत बहिरर्गेडे साहेब, राखो इंडस्ट्रीज भोसरी हेमंत मिस्त्री साहेब, यश इंजिनिअरिंग बारामती संचालक विजयकुमार पवार साहेब, संस्कार इंजीनियरिंग वर्क्स संभाजीनगर संचालक एस.बी मुसाळे साहेब, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार साहेब, बारामती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर साहेब,माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक अशोकराव पाटील साहेब यांच्या सत्कार संघटनेचे खजिनदार संदिप रणसिंग ,अजय मोरे ,गणेश चौधरी,अनिल दिंघे अंकुश तुरकुंडे,सोमनाथ उगले, यांनी केला. तसेच गजानन चौगुले(मा.सहसंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य ) यांनी बॉयलर परीक्षा संदर्भात माहिती व बॉयलर विषयी मार्गदर्शन,
स.तु.बधे साहेब (सहसंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य ) बॉयलर क्षेत्रात भरीव कामगिरी अमूल्य अशा योगदानाकरिता याना सन्मानपत्र गौरवपूर्ण प्रदान करण्यात आले. तसेच उत्कृश गुणवंत कामगार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पहिले पाच मानकरी वैजनाथ पाटील (जिल्हा कोल्हापूर),जगदीश उंबरे (जिल्हा सांगली),
लहू सेप (जिल्हा बीड), हनुमान ठोंबरे (जिल्हा सातारा), नागनाथ पवार (जिल्हा सोलापूर) यांना उत्कृद्ध कामगार गुणवंत पुरस्कार व ट्रॉफी प्रदान करण्यात आले. सन – २०२५ या वर्षात BOE परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आले.
संघटनेचे राज्य सहसचिव शशिकांत पवार साहेब यांची कन्या वृषाली शशिकांत पवार,डॉक्टरेट पदवी (Ph | D)फिलासाॅफर ऑफ डाॅक्टरेट इन आर्किटेक्ट अमेटी युनिवर्सिटी नोएडा दिल्ली,भारत यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल,सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गौरविण्यात व सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांनी बाष्पकाचा सुरक्षित वापर करण्यासंदर्भात बाष्पक परिचारांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच मुलांना बाष्पके क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये जनजागृती संघटनेच्या मार्फत केले जाईल. तसेच बॉयलर क्षेत्रात बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल व संघटनेच्या मार्फत बॉयलर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊ त्यावर काम केले जाईल. बॉयलर परिचर परीक्षेच्या तयारीसाठी अंकुश वाकचौरे यांच्या वाढदिवसानिमित्त टिफिन बॅग, कॅलेंडर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील बॉयलर क्षेत्राच्या निगडित असणान्या मान्यवर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल सावळे साहेब यांनी केले तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश वाकचौरे यांनी संघटनेचे उद्दिष्टे व संघटनेने तीन वर्षात केलेल्या कामाची माहिती थोडक्यात वर्णन केले.
कार्यक्रम हॉलमध्ये बॉयलर संबंधित वेगवेगळ्या उत्पादकांच्या मार्फत छायाचित्रीकंरण करण्यात आले होते.
बाष्पके क्षेत्रासाठी उपयुक्त विषयावर प्रत्येक रविवारी बॉयलर क्षेत्रातील मान्यवरांचे ऑनलाईन मार्गदर्शन,
बॉयलर क्षेत्रातील कामगारांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या वतीने सतत प्रयत्न करणे, सन-२०२५ साठी दिनदर्शिका नऊ हजार तयार करून संपूर्ण महाराष्ट्रातभर प्रत्येक जिल्ह्यात कर्मचान्यांना कॅलेंडर मोफत वाटप केले.
कॅलेंडरमध्ये बॉयलर विषयी माहिती प्रत्येक पानावरती प्रकाशित केलेली आहे. तसेच प्रथम व द्वितीय श्रेणी बाष्पक परिचय क्षमता परीक्षा सन-२०२५ साठी प्रत्येक रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रातील ७ प्रादेशिक कार्यालय विभागामध्ये ऑफलाईन मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात येईल.
बॉयलर परिचर परिक्षेला बसवण्यासाठी संघटनेच्यावतीने संपूर्ण माहिती दिली जाईल .संघटना पूर्ण क्षमतेने काम करेल असे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष चव्हाण साहेब यांनी केले. कार्यक्रमासाठी बॉयलर व संबंधित उपकरणे व साहित्य उत्पादक कंपन्यांच्या सहभाग, व्ही आर बॉयलर बारामती,शिवम सेल्स अँड सर्व्हिसेस बारामती ,मराठा इंटेलिजन्स सिक्युरिटीचे बारामती, प्रिव्हेनज बिकसन्स बॉयलर्स विमाननगर,एस्बी पावर सोल्युशन प्रा लि इंदापूर , राखो इंडस्ट्रीज भोसरी,यश इंजिनिअरिंग बारामती,संस्कार इंजीनियरिंग वर्क्स संभाजीनगर, तसेच सर्वांनी बहुमुल्य प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचेही या ठिकाणी संघटनेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमांत यशस्वीरित्या व क्रियाशील सहभाग घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र व पेन देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम महा बॉयलर AGKS या बुट्युब लाईव्ह चॅनलवर थेट प्रसारीत करण्यात आले.
Web Title: Grand Boiler Attendant Workers’ Gathering on the Occasion