Home अहमदनगर राहता कोपरगाव तालुक्यात ऑक्सिजन तुटवडा, काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन

राहता कोपरगाव तालुक्यात ऑक्सिजन तुटवडा, काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन

Rahata Kopargaon insufficient oxygen

शिर्डी: संगमनेर व सिन्नर येथून ऑक्सिजन सिलिंडर मिळणे बंद झाल्याने शिर्डी व राहात्यातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा (insufficient oxygen) निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयाकडे काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहेत. साई बाबा संस्थांनमध्ये बेडच शिल्लक नाही.

एका बाजूने रुग्णाची संख्या वाढत आहेत तर दुसरीकडे ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहता व कोपरगाव रुग्णालयात ऑक्सिजन आवश्यक असणारे रुग्ण घेण्यास थांबविले आहे. तर अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शिर्डी, राहता, कोपरगाव येथे संगमनेर येथून ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून थांबविण्यात आला आहे. संगमनेरच्या रुग्णांना पुरेसा इतका सिलेंडर उपलब्ध नसल्याने संगमनेर करांनी ऑक्सिजन देणे थांबविले आहे.  त्यामुळे कोपरगाव व राहता तालुक्यातील रुग्णालये ऑक्सिजनवर आले आहे. काही रुग्णालयांकडे रात्रीपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे.

प्रांतधिकारी गोविंद शिंदे व राहाता तहसीलदार कुंदन हिरे हे ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाठपुराव्यानंतर थोडे सिलेंडर नगरहून येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Rahata Kopargaon insufficient oxygen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here