लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
लॉज मध्ये देह विक्री अन् वेश्या व्यवसायचा (prostitution) पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश.
वैजापूर: वैजापूर शहरातील लक्ष्मी टॉकीज परिसरामध्ये असलेल्या लक्ष्मी लॉज मध्ये देह विक्री अन् वेश्या व्यवसायचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मॅनेजर व लॉज चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भरवस्तीत राजकीय पदाधिकाऱ्यांच्या लॉजमध्ये हा सर्व प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की,, शहरातील लक्ष्मी टॉकीज परिसरातील लक्ष्मी लॉज या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती दामिनी पथक व सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी पथकासह त्या ठिकाणी जात छापा टाकला. यावेळी त्यांना दोघेजण स्वतःच्या फायद्यासाठी एका पीडित महिलेला बोलून वेश्याव्यवसाय करून घेत असताना मिळून आले. घटनास्थळावरून रोख रक्कम, निरोधक, मोबाईल असा 36 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात मच्छिंद्र विनायक जगदाळे (वय ते 43 वर्षे रा. बेलगाव) व विष्णू भिमराव जेजुरकर (वय 73 वर्षे रा. महाराणा प्रताप रोड) या दोघांविरुद्ध वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक कैठाळे हे करीत आहेत.
Web Title: Prostitution in lodges exposed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App