मेसच्या नावाखाली राहत्या घरात वेश्या व्यवसाय, चार महिलांची सुटका
Beed Crime| Prostitution Business: बीडमधील वेश्या व्यवसायावर छापेमारी.
बीड: बीडमधील वेश्या व्यवसायावर छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी चार पीडित महिलांची सुटका करून चार आरोपींवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 24 फेब्रुवारी रोजी बीडच्या एएचटीयू आणि एलसीबीच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
24 फेब्रुवारी 2025 रोजी शिवाजी नगर येथे सह्याद्री हॉटेलच्या विरुद्ध दिशेच्या गल्लीत हॉटेल किनारा जवळ एक इसम मेसच्या नावाखाली त्याची पत्नी व एक खाजगी इसम यांच्या मदतीने त्यांच्या राहत्या घरात महीलांना बोलवुन वैश्या व्यवसाय करत असल्याची माहिती बीडच्या एएचटीयू पथकाला मिळाली होती, त्यावरून एएचटीयू पथकाच्या प्रभारी अधिकारी वर्षा व्हगाडे यांनी ही माहीती वरीष्ठांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके आणि एएचटीयू पथकास आदेश दिल्यानंतर रेडचे नियोजन करण्यात आले. त्यावरून दोन पंच व एएचटीयूचा स्टाफ, डमी ग्राहक हे शिवाजीनगर नगर येथे आले व तेथे डमी ग्राहकाने भुंकून इशारा करताच पथकाने रेड मारली. त्यावेळी तेथून बीड जिल्हयातील तीन व पुणे जिल्हयातील 1 महीला अशा चार महीला मिळून आल्या. तसेच आरोपी राजेंद्र प्रभाकर मुळूक (वय-50), त्याची पत्नी ज्योती राजेंद्र मुळुक (वय-35, दोघेही राहणार शिवाजी नगर) व खाजगी इसम उमेश सुनिलकुमार पारीख (रा. जालना रोड, बीड) यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजी नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली आहे.
Web Title: Prostitution business in a house under the name of Mace