व्याजाच्या पैशासाठी शरीरसुखाची मागणी करून वारंवार बलात्कार
Breaking News | Kolhapur Crime: व्याजाने दिलेल्या व्याजापोटी शरीरसुखाची मागणी करून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोल्हापूर : व्याजाने पैसे देऊन व्याजापोटी शरीरसुखाची मागणी करून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकास अटक केली. रामा विठ्ठल जानकर (वय ४६, रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. दारू पाजून बेशुद्ध करून छायाचित्र आणि व्हिडिओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक सुख घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ ते २४ दरम्यान त्याने हा गुन्हा गेल्याचे फिर्यादीने म्हटले असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, रामा जानकर याने फिर्यादी महिलेला २०१४ मध्ये दहा टक्के व्याजाने सत्तर हजार रुपये दिले होते. व्याज थकल्यानंतर फिर्यादी महिलेच्या असहाय्यतेचा फायदा जानकरने घेतला.
२०१४ ते २४ दरम्यान त्याने हा गुन्हा गेल्याचे फिर्यादीने म्हटले असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, रामा जानकर याने फिर्यादी महिलेला २०१४ मध्ये दहा टक्के व्याजाने सत्तर हजार रुपये दिले होते. व्याज थकल्यानंतर फिर्यादी महिलेच्या असहाय्यतेचा फायदा जानकरने घेतला.
दारू पाजवून बेशुद्ध अवस्थेत छायाचित्र व चित्रीकरण केले. छायाचित्रे आणि व्हिडिओ नातेवाइकांना दाखवणार, अशी धमकी दिली. तिच्यावर बळजबरी करून इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. तसेच व्याजासाठी राहते घर तीन लाखांसाठी बळजबरीने लिहून घेतले आहे. व्याजासह मुद्दल परत दे नाही तर शारीरिक संबंध ठेव, असा तगादा लावून वारंवार शारीरिक संबंध (sex relation) ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Repeated rape demanding physical pleasure for interest money