Sangamner Onion prices: आवक कमी झाल्याने उन्हाळी नंबर १ नंबर कांद्याच्या दराने उसळी घेतली.
संगमनेर: मागणी वाढली असून आवक कमी झाल्याने उन्हाळी नंबर १ नंबर कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. काल गुरुवारी झालेल्या लिलावात संगमनेर बाजार समिती आवारात कांद्याला ५०० ते ६०११ रुपयांचा भाव मिळाला आहे. गत आठवड्याच्या च्या तुलनेत ७०० ते ९०० रूपयांचा जादा दर मिळाला. बाजारभाव वाढल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला असलातरी मोजक्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे.
नाशिक आणि नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. पण यंदा पाऊस कमी झाल्याने या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात कांद्याची लागवड झाली आहे. त्यात ऑक्टोबर हिटमुळे त्यात ऑक्टोबर हिटमुळे बराचसा कांदा खराब झाला आहे. आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात त्यामुळे कांद्याचे पीक घेण्यात महिनाभराचा उशीर झाला आहे. त्यामुळेही कांद्याचे भाव वाढत आहेत.
काही दिवसांपूर्वी कांद्याला अगदीच कमी भाव मिळत होता. कांदा ७ ते ८ रुपये किलोने बाजारात खरेदी करण्यात येत होता. मात्र, आता घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकर्याना देखील दिलासा मिळत आहे. संगमनेर बाजार समिती आवारात २०११ गोणी कांद्याची आवक झाली. १ नंबर कांद्याला ६०११ रुपयांचा दर मिळाला. श्रीरामपुरात १५६ साधनांची आवक होऊन कांद्याला दर ४३०० ते ५५६० रूपयांचा दर मिळाला. कोपरगावात २५०० ते ५७०१ रूपयांचा भाव मिळाला.
Web Title: Onion Prices High in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App