अहमदनगर: बस व कारचा भिषण अपघात; एक ठार, दोन जखमी- Accident
नेवासा |Ahmednagar| Newasa: अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात गॅसवाहिनीचे काम सुरु असल्यामुळे महामार्ग एका बाजूने बंद करण्यात आल्यामुळे चालती बस स्विप्ट कारला आदळून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर गुंतून झालेल्या भिषण अपघातात (Accident) स्विप्ट कारमधील एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवार (दि.2) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहीती अशी की, महाड जळगांव बस आगाराची एस.टी जळगांवकडे जात असतांना स्विप्ट कार मधील पुणे येथील पाच जण शनिशिंगणापूर येथील देवदर्शन करुन देवगड येथून पुण्याकडे जात असतांना कांगोणी फाटा शिवारातील हॉटेल संगमनजीक महामार्गाच्या बाजूने गॅसवाहिनीचे काम सुरु असल्यामुळे एका बाजूने महामार्ग बंद केल्यामुळे महाड आगाराची बस स्विप्ट कारवर आदळली.
यावेळी स्विप्ट कारमध्ये पाच जण होते. त्यामधील विशाल ओर्हा (वय 36) रा.गंगाधाम पुणे हे या अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने महामंडळाची चालती बस स्विप्ट कारला धडकून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळून गुंतली. त्यामुळे बसमधील प्रवासी सुखरुप असल्याचे सुकृतदर्शनिय प्रवाशांनी ही माहीती दिली.
याबाबत शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दोन जखमींना नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Newsa Bus car Accident one death two injured