राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार, पाण्यात गुंगीचं औषध टाकून…
Crime: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कायकर्त्याने एका महिलेवर अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर: विवाहित महिलेला पाठलाग करत संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कायकर्त्याने एका महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नूर कॉलनी परिसरात हा प्रकार घडला. राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने संबंधित महिलेला घरी बोलावले आणि पाण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गीक अत्याचार केला. एवढ्यावर न थांबता अत्याचार करताना व्हिडिओ बनवत महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा शहर उपाध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्तार खान उर्फ बब्बू (वय ४२) राहणार नूर कॉलनी टाऊन हॉल असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, महिला सिटी चौक भागामध्ये पती व मुलांसह राहते. शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहर उपाध्यक्ष व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत असलेला मुख्तार खान उर्फ बब्बू याची नजर मार्च महिन्यामध्ये दृष्ट नजर पीडित महिलेवर पडली. त्यानंतर बब्बू याने महिलेचा पाठलाग करायला सुरुवात केली. बब्बू हा महिला घरातून बाहेर निघण्याची वाट बघत असे महिला घराबाहेर पडत असतो तिचा पाठलाग करून तिला धमकी देत असे मूल व पतीला अपहरण करून जीवे मारण्याची धमकी बब्बू हा देत होता.
दरम्यान महिला आपल्या धमकीला घाबरत असल्याची मुक्तार याच्या लक्षात आली. दरम्यान त्यांनी १२ मार्च रोजी महिलेला गाठले महिलेला धमकी देत टाऊन हॉल येथील घरी बोलावले. मुक्तार याच्या धमकीला घाबरलेली महिला टाऊन हॉल येथील मुक्तारच्या घरी आली. यावेळी मुक्तर याने पाण्यामध्ये गुंगीचा औषध दिले. यावेळी महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबतात आणि या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ देखील तयार केले. या प्रकरणी कुठे वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली.
या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरली होती दरम्यान घरी आल्यानंतर तिने ही बाब नातेवाईकांना सांगितली नातेवाईकांनी महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केले असता तिने घडलेल्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला दरम्यान महिलेला धीर देत तात्काळ सिटी चौक पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी फिर्याद देण्यात आली दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड करीत आहे.
Web Title: NCP activist rape a woman
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App