Home क्राईम संगमनेर:  तुला माझ्याबरोबर लग्न करायचे म्हणत महिलेचा विनयभंग

संगमनेर:  तुला माझ्याबरोबर लग्न करायचे म्हणत महिलेचा विनयभंग

Sangamner News: तू माझ्याबरोबर चल असे महिलेला म्हणत महिलेचा विनयभंग (Molested), दोघांवर गुन्हा दाखल.

Molested a woman saying you want to marry me

संगमनेर: महिलेच्या घरात घुसून तुला माझ्या बरोबर लग्न करायचे असे म्हणून दोघांनी तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. बुधवारी दि. २२ दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत १८ वर्षीय महिलेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय अशोक शेरेकर (र वेहळगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) सचिन संजय घुगे (रा. मंगळने त नांदगाव, जि. नाशिक) अशी गुन्हा  दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबबात अधिक माहिती अशी की,  शेरेकर आणि घुगे हे दोघे महिलेच्या घरात घुसले. ‘तू लग्नाला होकार कस काय दिला, मला तुझ्याबरोबर लग् करायचे होते. तू माझ्याबरोबर चल असे महिलेला म्हणत तिचा हात ओढू- तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आली. महिलेची जाऊबाई सोडविण्यास आली असता घुगे या त्यांना धक्काबुक्की करून ढकलून दिले. ‘तू आमच्याबरोबर चल नाहीत तुझ्या वडिलांना व भावाला भोसकून टाकू असा दम दिला. असेही फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलीस  ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. के ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पठाण अधिक तपास करीत आहे.

Web Title: Molested a woman saying you want to marry me

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here