आमदार रवी राणावर खालच्या भाषेत टीका महागात, बच्चू कडू यांच्यावर गुन्हा
Bachchu Kadu Crime: रवी राणांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका, बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीचा गुन्हा.
अमरावती : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळत आहे असे दिसून येत आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
बच्चू कडू हे संविधानाचा भान न ठेवता बेजबाबदारपणे वागत आहेत. शासकीय कार्यालयात जाऊन अनेक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे त्यांच्यावर हात उगारणे हा त्यांचा नेहमीचाच उद्योग झाला आहे. आमदार हा कर्मचाऱ्यांवर हात उभारत असेल तर तो अकार्यक्षम आहे हे स्पष्ट होते असे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या विरोधात वक्तव्य करताना बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या पत्नी आणि आईचा अपमान केला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत महिला मुक्ती आघाडीच्या वतीने बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. या तक्रारीच्या आकारावर पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला.
Web Title: MLA Ravi Rana in low language is expensive, crime against Bachchu Kadu
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App