कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Breaking News | Chatrapati Sambhajinagar Crime: कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत नात्यातील अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या घरात व हॉटेलमध्ये नेऊन एका नराधमाने अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना.
पैठण : कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत नात्यातील अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या घरात व हॉटेलमध्ये नेऊन एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यात उघडकीस आली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी (दि.१६) पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील एका कॉलनीत पीडीत मुलगी कुटुंबासह राहते. येथेच नात्यातील आरोपी राहतो. या आरोपीने माझ्याबरोबर आली नाहीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकेन, अशी धमकी देत मुलीला घरातून नेले व तिच्यावर आपल्या घरात व हॉटेलमध्ये वारंवार अत्याचार केला. ही बाब कुटुंबातील नातेवाईकांना कळताच त्यांनी पैठण पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार देत गुन्हा दाखल केला.
Web Title: minor girl was abused by threatening to kill her family
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study