आषाढीच्या दिवशीच स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक
Breaking News | Baramati Crime : कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये मृत अर्भक सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली. (dead female infant was found in the toilet)
पुणे : कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये मृत अर्भक सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. बारामतीच्या माळेगावातील कृषी विज्ञान केंद्राच्या स्वच्छतागृहामध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हे अर्भक नवजात स्त्री जातीचं असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी ही घटना उघडकीस आली. कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहात नवजात स्त्रीजातीचं अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अर्भकाचा जन्म झाल्याचं लपवून ठेवून बालकाची देखभाल न करता त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देश मनात ठेवूनच हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. तसेच, निर्दयी व्यक्तीनं नवजात अर्भकाला उघड्यावर टाकून दिल्याचं कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्यादीत नमूद केलं आहे. फिर्यादीवरुन माळेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अर्भकाला जन्माला येण्यापासून रोखण्याच्या किंवा त्यांच्या जन्मानंतर त्याचा मृत्यु होण्यास कारणीभूत राहिल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी आषाढी एकादशीच्या दिवशी बारामतीत घडलेल्या कृत्यावर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. बारामतीच्या माळेगावात एक कृषी विज्ञान केंद्र आहे. या कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये नवजात स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलं. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्याद दिली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचारी वर्गाच्या लक्षात ही घटना आली. तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
Web Title: dead female infant was found in the toilet on the day of Ashadhi
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study