संगमनेर: गांजा ओढणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: गांजा ओढणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले, त्यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.
संगमनेर : गांजा ओढणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले, त्यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी (दि.१७) सकाळी ९:२० ते १०:२० वाजेच्या सुमारास म्हाळुंगी नदीपात्र आणि नदीपात्राजवळ ही कारवाई करण्यात आली. गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर्ग परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २७ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या कारवाईत राजेश सोमनाथ दिघे (वय २९, रा. शिवरामनगर, कासारवाडी रोड, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत पांडुरंग सावळीराम आस्वले (वय ४९, रा. नॅशनल शाळेजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस कॉन्स्टेबल विशाल रामदास कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Crime against two ganja smokers
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study