Home अहिल्यानगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केस कापून तिला भिक मागण्यासाठी पाठवले

अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केस कापून तिला भिक मागण्यासाठी पाठवले

Ahmednagar Crime: अल्पवयीन मुलीचे लग्न लावून अत्याचार अन मग केस कापून भिक मागण्यासाठी पाठविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

a minor girl was abused and sent to beg after having her hair cut off

अहमदनगर: नगर शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या मामाच्या अल्पवयीन मुलासोबत लावण्यात आले. त्या मुलाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार (abused) केला. आता लग्नानंतर मामा-मामीने त्या पीडित अल्पवयीन मुलीचे केस कापून तिला मशिदीसमोर भिक मागण्यासाठी पाठविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पीडितेचे मामा-मामी, आई-वडील, लग्न लावणारा मौलाना व लग्न करून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अंगणवाडी सुपरवायझर भागीरथी सदाशिव बहिरवाडे (वय ५५ रा. दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वास भान्सी, अंमलदार सलीम शेख, शिवाजी मेहर यांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. १३ वर्षीय पीडितेचे बळजबरीने तिच्या मामाच्या अल्पवयीन मुलासोबत लग्न करून देण्यात आले होते. लग्न झाल्यानंतर अल्पवयीन मुलाने तिच्याशी शरीरसंबंध ठेवून अत्याचार केला. लग्नानंतर १० ते १२ दिवसांनीच पीडितेच्या सासू-सासऱ्यांनी तिचे केस कापून तिला एका मशिदीसमोर भिक मागण्यासाठी पाठवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक भान्सी करीत आहेत.

Web Title: a minor girl was abused and sent to beg after having her hair cut off

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here