मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध, सदावर्तेंना हायकोर्टाचे निर्देश, म्हणाले
Maratha Reservation: मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश.
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टाने सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठात जाण्याचे निर्देश दिले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र सदावर्ते यांनी जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टातील मूळ खंडपीठाने नकार दिला.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठानं प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग केलं. काही कारणास्तव या याचिकेवरील सुनावणीस न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठात दाद मागावी लागणार आहे.
Web Title: Maratha Reservation Opposition to Manoj Jarang’s movement, High Court’s directive to Sadavartena
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study