संगमनेर: दूधगंगा पतसंस्थेच्या व्यवस्थापकास अटक, अध्यक्षासह इतर आरोपी फरारच
Sangamner News: दूधगंगा पतसंस्थेत तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार, पतसंस्थेच्या व्यवस्थापकास अटक (arrested).
संगमनेर: दूधगंगा पतसंस्थेत तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला. आगोदर चार आरोपींना अटक करण्यात आली असून काल व्यवस्थापकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
आर्थिक घोटाळ्यातील येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला अखेर काल सकाळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील पतसंस्थेचा अध्यक्ष व इतर आरोपी अद्यापही पसारच आहेत. सर्व आरोपींना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करून आमचे पैसे द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दूधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे.
दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल 81 कोटी रुपये पेक्षा अधिक अपहार झाला आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी केलेल्या फेर लेखापरीक्षणात हा अपहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह 21 जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील चार जणांना अटक करण्यात आली होती. काल सकाळी व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यालाही अटक करण्यात आली आहे. दूधगंगा पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ याला सकाळी त्याच्या निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेतले. समजलेल्या माहितीनुसार गुंजाळ हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होणार होता मात्र काही समस्या उद्भवू नये यासाठी पोलिसांनी त्याला त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेतले.
दरम्यान दूधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले. आर्थिक घोटाळ्यातील सर्व आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी, या आरोपींची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या सर्व ठेवी परत द्याव्यात, अशी मागणी यावेळी ठेवीदारांनी केली. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ठेवीदारांनी पतसंस्थेच्या अध्यक्षावर गंभीर आरोप केले. मोहन लांडगे यांनी पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या विविध ठिकाणी असणार्या मालमत्तेची यादी यावेळी वाचून दाखवली.
Web Title: Manager of Dudhganga Patsanstha arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App