सिन्नर: माजी सरपंचाकडून विवाहित महिलेवर अत्याचार
Breaking News | Sinner Crime: सोनांबे येथील माजी सरपंच यांच्यावर विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल.
सिन्नर: सोनांबे येथील माजी सरपंच जनार्दन लक्ष्मण पवार यांच्यावर विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २४ वर्षीय महिलेने सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली असून पवार यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुरुवारी (ता.१) मेस सकाळी दहाला सासू घराबाहेर व पती कामावर गेलेला असताना घराच्या मागील दरवाजातून जनार्दन पवार आत घुसले. महिलेशी लगट करून बळजबरी केली. यावेळी महिलेला भिंतीवर लोटून देवून चापटीने मारहाण करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी जनार्दन पवार यांच्यावर बलात्कार, मारहाण करणे, दमदाटी देणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. जनार्दन पवार यांचे १० दिवसापूर्वीच सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्यासमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालास आव्हान देण्यात आले होते. यात मागील पंचवार्षिक काळात सदस्य असताना केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी चालू पंचवार्षिक काळातील सदस्यत्व रद्द होण्याबाबतचा निर्णय देण्यात आला. नुकतेच सरपंचपद गमवावे लागलेल्या जनार्दन पवार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने सोनांबे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.
Breaking News: Maji Sarpanchakadu Married Woman abused