२४ वर्षीय बांगलादेशी तरुणीची देहविक्री, लॉजवर छापा टाकला तर धक्कादायक माहिती समोर
Breaking News | prostitute Business: आधार कार्ड वापरून २४ वर्षीय बांगलादेशी तरुणी देहविक्रीचा व्यवसाय.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील झाल्टा फाटा येथील लॉजवर अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी छाप टाकला. यावेळी २४ वर्षीय बांगलादेशी तरुणी देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणी व तिच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
अभिजीत उर्फ राहुल बाळासाहेब जाधव राहणार तळेगाव घनसावंगी जालना ह.मु.झाल्टा फाटा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ,झाल्टा फाटा येथे एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी सापळा रचला.
संबंधित हॉटेलवर छापा टाकला असता या कारवाईत 24 वर्षीय बांगलादेशी तरुणी देहविक्री करत असल्याचे समोर आले. चौकशी केली असता संबंधित तरुणीही बांगलादेश येथील असल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित तरुणीला भारतीय नागरिकत्वाबाबत विचारले असता तिच्याकडे बनावट आधार कार्ड आढळून आले आहे. दरम्यान परवानगी नसताना 24 वर्षे तरुणी बेकायदेशीरपणे बांगलादेशातून भारतात आली.
ती गेल्या काही दिवसांपासून झाल्टा फाटा येथील हॉटेलवर अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय करत होती. याप्रकरणी पोलिसांनी परकीय नागरिक आदेश १९४८ ची परिच्छेद ३ (१)(अ) परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ पारपत्र (भारत प्रवेश) नियम १९५० च्या नियम ३ व ६ व परकीय नागरिक आदेश १९७१ अंतर्गत दोघांविरुद्ध चिखलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रविकिरण दरवडे करीत आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडालीये. पोलिसांकडून याप्रकरणी अधिकचा तपास केला जातोय.
Breaking News: 24 year old Bangladeshi prostitute, lodger raided