Home संगमनेर अखेर त्या संगमनेरातील बियर बारला  टाळे- Locked

अखेर त्या संगमनेरातील बियर बारला  टाळे- Locked

Sangamner News: नेहरू चौकातील सुरभी बियर बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल कारवाई करत या बारला सील ठोकले (Locked).

Locked Surbhi Beer Bar in Sangamner

संगमनेर:  तालुक्यातील रायतेवाडी  येथील बनावट दारू कारवाईनंतर वादग्रस्त ठरलेल्या शहरातील नेहरू चौकातील सुरभी बियर बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल कारवाई करत या बारला सील ठोकले आहे.  या कारवाईमुळे शिवसेनेच्या व दारूबंदी कृती समितीच्या मागणीला यश आले आहे.

तालुक्यातील रायतवाडी शिवारात दि. 15 ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका राहत्या घरात छापा टाकून  तेथील बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर कार्यवाही केली. या कारवाईत गोवा व दमन येथील दारुसाठा हस्तगत करण्यात आला. याठिकाणी महाराष्ट्रातील दारू निर्मिती करणार्‍या नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या व त्याचे रिकामे झाकण मोठ्या प्रमाणावर हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी चैतन्य सुभाष मंडलिक व सुरेश मनोज कालडा या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करून संबंधित बारवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील आरोपी सुरेश मनोज कालडा त्यांच्या घरातील ओमप्रकाश कालडा यांचे नावे हॉटेल सुरभी परमीट रूम व बार, तेलीखुंट, संगमनेर येथे अधिकृत परवानाकक्ष आहे.

तसेच अकोले येथील हॉटेल सुरभी विंग हे परवाना कक्ष शोभा कालडा यांच्या नावे आहे व एक बियर शॉपी संबंधिताच्या नावे आहे. संबंधित अधिकृत परवाना कक्षाच्या आड तिन्ही ठिकाणी बनावट तयार केलेल्या दारुची विक्री व साठवणूक व इतर अनधिकृत ठिकाणी वितरण केले जायचे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे असून त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होऊन पांगरमल प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे या बियर बारवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी श्री. कतारी यांनी केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल संगमनेर व अकोले येथील बार सील केले.

Web Title: Locked Surbhi Beer Bar in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here