संगमनेर: विजेचा शॉक देऊन पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप
Sangamner Crime News: गर्भपात केला नाही या कारणावरून पत्नीच्या तोंडावर उशिने दाबून तिच्या हाताच्या तर्जनीला इलेक्ट्रिक वायर बाधून शॉक देत तिचा खून (Murder), संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील घटना २०१६ रोजी घडली होती. दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर गर्भपात केला नाही या कारणावरून पत्नीच्या तोंडावर उशिने दाबून तिच्या हाताच्या तर्जनीला इलेक्ट्रिक वायर बाधून शॉक देत तिचा खून केल्याप्रकरणी पतीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे तर सासू आणि दिराची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली.
बाळासाहेब भिकाजी पिलगर वय ३२ वर्ष असे पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २७ वर्षीय वर्षा बाळासाहेब पिलगर ही विवाहिता दुसऱ्यांदा गरोदर राहिली याची माहिती समजल्याने नवरा बाळासाहेब, दिर सुरेश सासू लिलाबाई यांनी तिने गर्भपात करावा असे सांगितले तिने ते ऐकले नाही, याचा राग मनात धरून आरोपींनी तिच्या नाका तोंडावर ऊशीने दाबत तसेच तिच्या हाताच्या तर्जनीला इलेक्ट्रिक वायर बांधून तिला शॉक जीवे ठार मारले. अशा आशयाची तक्रार वर्षा हिच्या वडिलांनी आरडी पोलीसात दाखल केली होती
३० जुलै २०१६ रोजी ही घटना घडली होती तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कामाले लेखनिक हवालदार तात्याराव वाघमारे यांनी या खून प्रकरणाचा तपास करून संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते, जिल्हा न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले.
आरोपीच्या आणि सरकार पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपी नवरा बाळासाहेब पिलगर याला पत्नीच्या खून प्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय त्याला आणखी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खून प्रकरणातील अन्य आरोपी विरोधात पुरेसे पुरावे न्यायालयासमोर न आल्याने त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांना सहाय्यक फौजदार सुनील सरोदे पोलीस कर्मचारी सारिका डोंगरे प्रवीण डावरे चंद्रकांत तोरवेकर दिपाली दवगे स्वाती नाईकवाडी एकनाथ खाडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या खून प्रकरणाचा सुनावणीकडे संगमनेर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.
Web Title: Life imprisonment for husband who Murder wife by giving electric shock