Home अकोले निळवंडे कालव्यांचा अकोलेतील ठेकेदार बदलावा

निळवंडे कालव्यांचा अकोलेतील ठेकेदार बदलावा

लोणी: अगोदर कालवे व नंतर धरण अशी जलनीती असताना निळवंडे धरणाच्या बाबतीत सर्व जलनीती धाब्यावर बसविण्यात आले आहे. निळवंडे कालवे अकोले तालुक्यात अतिशय संथ गतीने सुरु असल्याचे निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या पाहणी दौऱ्यात स्पष्ट झाले आहे.

लाभधारक शेतकऱ्यांचा आडगाव या दुष्काळी भागातील गावात मेळावा घेऊन कामाच्या सध्य स्थितीचा लेखा जोखा मांडण्यात आला. यावेळी अकोले तालुक्यातील ठेकेदार बदलण्याची मागणी सर्व शेतकऱ्यांनी खासदार सदाशिव लोखंडे व जलसंपदा विभागाकडे केली. या मेळाव्याला लाभधारक शेतकऱ्यांसह खासदार सदाशिव लोखंडे व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी अकोले तालुक्यात निळवंडे कालव्यांची कामे सुरु झालेली आहेत. पावसाळ्यात कामे संथ असणार हे समितीने गृहीत धरले होते. मात्र पावसाला संपताच निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी दौरा केला त्यात कामाची गती संथ असल्याचे लक्षात आले. या सर्व गोष्टींची माहिती लाभधारक शेतकऱ्यांना झाली पाहिजे या उद्देशांने शुक्रवारी या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

शिवाजी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शेतकरी मेळाव्यात अकोलेतील कामांचा लेखाजोखा समितीचे कार्यकर्ते सुखलाल गांगवे यांनी मांडला. गेली दहा वर्षापासून ठेकेदार कामात कसा हलगर्जीपणा करत असल्याचे त्यांनी शेतकरी व लोकप्रतिनिधीनी लक्षात आणून दिले आहे. यावर बोलताना खासदार लोखंडे यांनी कामाला गती देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत असे स्पष्ट केले. ठेकेदाराची मुजोरी यापुढे सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदार मुजोरी करत असेल तर त्याची गय करणार नाही असे आश्वासन लोखंडे यांनी दिले. दीड वर्षात पाणी आणायचे असेल तर ठेकेदार बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचे नानासाहेब शेळके यांनी स्पष्ट केले. एका महिन्याची ठेकेदाराला मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर त्यांच्यावर कार्यवाहीचे आश्वासन जलसंपदा विभागाकडून देण्यात आले आहे.   

Website Title: Latest News canals with Akole contractor 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here