Home महाराष्ट्र शेतातील विहिरीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

शेतातील विहिरीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

Breaking News | Crime: शेतातील विहिरीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आले.

dead body of a beloved couple was found in a shambles

केळझर | वर्धा: परिसरातील किन्हाळा साजातील दहेगाव (गोसावी) रोडच्या बाजूला असलेल्या एका शेतातील विहिरीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आले. मृत महिलेचे नाव सुमन सतीश लडके (३३, रा. जाम, ता. हिंगणघाट), तर मृत पुरुषाचे नाव मोहन गोपाल वैद्य (४१, रा. टाकळघाट, ता. हिंगणा, जि. नागपूर) असे आहे. मृत दोघेही विवाहित होते. त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही १ मेपासून घरातून बेपत्ता होते. दोघांच्याही कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

सुमन सतीश लडके (वय ३३) रा. शिंदोला जिल्हा चंद्रपूर ह. मु. जाम, मोहन गोपाल वैद्य (वय ४१) रा. टाकळघाट अशी मृतकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमन यांचे पती जाम येथे नोकरी करतात. बारा वर्षापासून ते क्वॉर्टरमध्ये राहतात. मोहन हे बुट्टीबोरी येथे कंपनीत असल्याने कुटुंंबासह टाकळघाट येथे किरायाने राहतात. सुमन लडके यांची १ मे रोजी समुद्रपूर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार करण्यात आली होती. मोहन वैद्य यांची २ मे रोजी टेंभरी (एमआयडीसी) नागपूर ग्रामीण पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार आहे. दरम्यान, सोमवारी ५ मे रोजी सकाळी केळझर – दहेगाव मार्गावरील किन्हाळा शिवारातील शेतातील विहिरीजवळ परिसरातील शेतकर्‍याला बॅग आणि चपला दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला.

याची माहिती गावात मिळताच गावकर्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती दहेगाव गोसावी पोलीस पाटील मोहन काळे व केळझरचे पोलीस पाटिल प्रकाश खंडाळे यांनी  सेलू पोलिसांना दिली. माहिती मिळताच सेलुचे ठाणेदार मनोज गभने, एएसआय जावेद धामिया, जमादार श्रावण ठाकरे, रत्नाकर कोकाटे, लोकेश पवनकर यानी घटनास्थळ गाठले. दहेगाव (गो.) पोलीस स्टेशनचे धर्मेन्द्र तोमर यावेळी उपस्थित होते. स्थानिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विहिरीतील पाण्याचा उपसा केला असता मोहनचा मृतदेह विहिरीतच दिसून आला. मृतदेह बाहेर काढून सेलू पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहेत.

Breaking News: dead body of a beloved couple was found in a shambles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here