Home महाराष्ट्र प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकाचा खून, सात जणांना ताब्यात

प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकाचा खून, सात जणांना ताब्यात

Breaking News | Satara Crime: love affair, प्रेमसंबंधाच्या संशयावरून सात जणांनी अपहरण करीत बेदम मारहाण करून युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना.  

Youth murdered due to suspicion of love affair, seven people arrested

कऱ्हाड : प्रेमसंबंधाच्या संशयावरून सात जणांनी अपहरण करीत बेदम मारहाण करून युवकाचा खून केला. वाठार, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कहऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

रहिमतुल्ला सलीम आतार (वय २७, रा. कासेगाव) असे खून झालेल्या युवकाचे आहे. सुदाम मोहन पवार (वय २७), राकेश रामदास पाटील (वय २६), अमर सुरेश खोत (वय २७), विराज युवराज तोडकर (वय २६), उमेश रवींद्र पाटील (वय २८), विशाल हणमंत शिंदे (वय २३) व ऋषिकेश धनाजी तोडकर (वय २६, सर्व रा. कासेगाव, ता. वाळवा) अशी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील रहिमतुल्ला आतार हा मोबाइल दुरुस्तीचा व्यवसाय करीत असल्याने त्याचे कऱ्हाडला नेहमी येणे-जाणे होते. सोमवारी दुपारीही तो कऱ्हाडला येण्यासाठी निघाला होता. मात्र, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संशयितांनी त्याला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून त्याचे अपहरण केले.

त्यानंतर त्याला रेठरे व कासेगाव येथे विविध ठिकाणी नेऊन दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोखंडी गज, लाकडी दांडके व पीव्हीसी पाइपने बेदम मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रहिमतुल्ला याला संशयीतांनी त्याच्या घरी सोडले. नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Breaking News: Youth murdered due to suspicion of love affair, seven people arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here