Home अहमदनगर अहमदनगर: महामंडळाच्या बसमधून लाखो रुपयांचा गांजा, काय आहे प्रकरण?

अहमदनगर: महामंडळाच्या बसमधून लाखो रुपयांचा गांजा, काय आहे प्रकरण?

Breaking News | Ahmednagar: पोलिसांच्या भीतीने सव्वा लाखाचा गांजा सोडून पळाला.

Ganja worth lakhs of rupees from corporation bus

कोपरगाव : कोपरगाव शहरातील बसस्थानकात अज्ञात व्यक्ती आपल्या बॅगमधील गांजा बस बंद पडल्यामुळे भीतीपोटी सोडून पसार झाली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून १ लाख २२ हजार ४८० रुपयांचा गांजा कोपरगाव शहर पोलिसांनी जप्त केला. अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २० रोजी दुपारी तीनच्या सुमारास चोपडा-पुणे या बस (क्र. एमएच- १३ सीयू- ८४७५) मध्ये १२.२४८ कि.ग्रॅम वजनाचा १ लाख २२ हजार ४८० रुपयांचा गांजा अज्ञात व्यक्तीने पिशवीत ठेवला. बसमध्ये बिघाड झाल्याने भीतीपोटी गांजाने भरलेली बॅग बसमध्ये सोडून गेला. बॅगचा संशय आल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलिसांना माहिती दिली. तपास केला असता या बॅगमध्ये गांजा आढळला.

Web Title: Ganja worth lakhs of rupees from corporation bus

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here