Home पुणे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Breaking News: तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून खाली डोकावताना तोल गेल्याने चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

four-year-old boy died after falling from the third floor of a building

चाकण : तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून खाली डोकावताना तोल गेल्याने चार वर्षाच्या मुलाचा जीव गेला आहे.  ही घटना सोमवारी (दि.8) सकाळी चाकण जवळील आंबेठाण गावातील साईबाबा पॅराडाईज येथे घडली. दुर्वेश ज्ञानेश्वर कारवार (वय- 4 रा. साईबाबा पॅराडाईज, आंबेठाण) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. दुर्वेशच्या अचानक जाण्याने कारवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  दुर्वेश सकाळी बेडरुममध्ये खेळत होता. तो खेळता खेळता बेडरूमच्या खिडकीजवळ गेला. खाली पाहण्याचा प्रयत्न केला असता त्याचा तोल गेल्याने खाली पडला. घटना घडली त्यावेळी घरामध्ये त्याची बहीण, काकू आणि आजी होती. तर त्याचे आई-वडिल कामावर गेले होते. दुर्वेश याला तातडीने नाणेकरवाडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.

दुर्वेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले. दुर्वेश याची मावशी जयश्री कारवार यांनी या घटनेची माहिती चाकण पोलिसांना दिली. चाकण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: four-year-old boy died after falling from the third floor of a building

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here