Accident: कार व टेम्पोच्या अपघातात संगमनेर तालुक्यातील पाच जण जखमी
पारनेर | Accident: पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा ते निघोज दरम्यान पुढे चाललेल्या टेम्पोला मागून आलेल्या एका कारने धडक दिल्याने अपघाताची (Accident) घटना घडली आहे. या अपघातात कार मधील संगमनेर तालुक्यातील नांदूर खांदरमाळ येथील पाच जण जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. यामध्ये अंकुश लेंधे, लहानु लेंधे, चालक गणेश लेंधे, जयराम गोंधे, ऋषिकेश शिंदे हे पाचजण होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कार मधील सर्वजण संगमनेर तालुक्यातील नांदूरखंदमाळ येथील असून हे सर्वजण निघोज येथे शिंदे यांच्या कडे एका घरगुती कार्यक्रमास जात होते.
मात्र निघोजच्या अलीकडेच शिरसुले फाटा इथे उतारावर कारने वेग पकडला आणि पुढे असलेल्या टेम्पोवर कार धडकली. हा अपघात एवढा मोठा होता की कार टेम्पोत मागून आत अडकली.
यावेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले. जखमींना निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रात व पुढे शिरूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
Web Title: Five persons from Sangamner taluka were injured in a car and tempo accident