Home अहमदनगर अखेर बाप्पा आले धावून, नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

अखेर बाप्पा आले धावून, नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

Ahmednagar News:  जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 97 महसूल मंडळांपैकी 77 ठिकाणी दमदार पाऊस (Rain).

Finally Bappa came running, rain everywhere in Nagar

अहमदनगर :  बऱ्याच प्रतीक्षेनंतर  विघ्नहर्ता गणपती बाप्पा जिल्हावासीयांना धावून आले आहेत. नगरवासियांना ते पावले आहे.  गुरूवारी सायंकाळी (दि.21) ते शुक्रवार (दि.22) पहाटेच्या दरम्यान जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 97 महसूल मंडळांपैकी 77 ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. यातील 17 महसूल मंडळात 65 मिली मीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून यात सर्वाधिक नेवासा तालुक्यातील नेवासा बु आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव मंडळात प्रत्येकी 115 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी रात्रीही श्रीरामपूर, राहुरी, राहाता व संगमनेर भागात पावसाची संततधार सुरू होती.

गुरूवारी सायंकाळी उशीरा नगर दक्षिणेतील श्रीगोंदा, शेवगाव, उत्तरेतील नेवासा, कोपरगाव या तालुक्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्री उशीरापर्यंत अकोले वगळता उर्वरित सर्व तालुक्यात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. शुक्रवारी पहाटेपर्यंत हा पाऊस सुरू होता. जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर, श्रीगोंदा शहर आणि परिसर, बेलवंडी, कोळगाव, माहिजळगाव. शेवगाव तालुक्यातील शेवगाव शहर, बोधेवगाव, चापडगाव, भातकुडगाव, एरंडगाव, पाथर्डी तालुक्यातील मीरी, नेवासा तालुक्यातील नेवासा बु, सलाबतपूर आणि कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, कर्जत तालुक्यातील मिरजगाव महसूल मंडळात 65 मिली मिटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

यासह नालेवगाव, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेउर, चिंचोडीपाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी. पारनेर, भाळवणी, वाडेगव्हाण, वडझीरे, निघोज, टाकळी, पळशी. श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, चिंबळा, देवदैठण, कोळगाव, कर्जत, मिरजगाव. अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, शेवगाव, भातकूडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजगाव, एरंडगाव. पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी, नेवासा बु, नेवासा खु, सलाबतपूर, कुकाणा, चांदा, घोडेगाव, वडाळा. राहुरी, सात्रळ, ताराबाद, देवळाली, टाकळीमियॉ, ब्राम्हणी, वांबोरी. आश्‍वी, सीबलापूर, तळेगाव, समानापूर, घारगाव, डोळसणे, साकूर, पिंपळणे. कोपरगाव, रवंदेख, सुरेगाव, दहिगाव, पोहेगाव. श्रीरामपूर, बेलापूर, उंदिरगाव, टाकळीभान. राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्‍वर, पुणतांबा या ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे.

शुक्रवारी दुपारी एकपासून नगर शहरात दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी बरसत होत्या. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी डबक्यात पाणीसाठले होते. आधीच नगर शहरातील रस्त्यांची वाट लागलेली असून त्यात पावसाचे पाणीसाठल्याने नगरकरांची तारंबळ झाली. गणेशोत्सव सुरू असून सलग दुसर्‍या दिवशी पाऊस झाल्याने उत्सव साजर्‍या करणार्‍या मंडळाची आणि कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली. मात्र, तरी देखील आणखी पाऊस यावा, अशी प्रार्थना मंडळाच्या वतीने बाप्पांना करण्यात येत होती.

Web Title: Finally Bappa came running, rain everywhere in Nagar

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here