संगमनेर ब्रेकिंग! शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू
Breaking News | Sangamner: साकूर जवळील बिरेवाडी येथील एका शेतकऱ्याचा मुळा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील एका शेतकऱ्याचा मुळा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. ७ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. दिनकर सोनबा ढेंबरे (वय ५५) रा. बिरेवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, दिनकर सोनबा ढेंबरे हे साकूर जवळील बिरेवाडी येथील रहिवासी आहे. शुक्रवारी दिनकर ढेंबरे हे मुळा नदीवर एका कामानिमित्त गेले होते. बनाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर दिनकर ढेंबरे काही तरी काम करत असताना त्यांचा पाय घसरून ते मुळा नदीच्या पात्रात पडले. त्यानंतर पाण्यात बुडूनच त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
तसेच याबाबतची माहिती घारगाव पोलिस स्टेशनला मिळताच तातडीने पो. कॉ. प्रमोद गाडेकर, पोलिस नाईक दत्तू चौधरी, पो.कॉ महादेव हांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दिनकर ढेंबरे यांचा मृतदेह ट्युबच्या साहाय्याने नदी पात्राबाहेर काढण्यात आला. त्यानंतर रूग्णवाहिकेला पाचारण करत दिनकर ढेंबरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत घारगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास घारगाव पोलिस करत आहेत.
Web Title: Farmer drowns in river