एक तर तू झोप, नाहीतर जावेला पाठव, 19 वर्षीय नराधमाचे 36 वर्षीय महिलेकडे मागणी, नकारानंतर भयंकर
Breaking News | Sambhajinagar Crime: भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केल्याची धक्कादायक घटना. (Sex demand)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले. त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. सव्वादोन फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे. मरणयातनांपेक्षा भयंकर वेदना सहन करीत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अभिषेक तात्याराव नवपुते असं या आरोपीचं नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा आविर्भावात नराधम आरोपी फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर 36 वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने विकृताने तिच्यावरती वार केले आहेत. तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (19, रा. घारदोन) असे विकृताचे नाव आहे, चिकलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महिला शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो म्हणाला की, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे. महिलेनं फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्यानं वेणी खेचली आणि डोके दगडावर आपटलं. महिलेला काही कळायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला. महिला ओरडायचा प्रयत्न केला तर त्यानं गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार सुरू केले. पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढला, अशा विकृत मानसिकतेच्या नराधम आरोपीपासून महिलेने बचावाचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्यावरती वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
Web Title: 19-year-old man demands sex from 36-year-old woman