रेशनिंगच्या अवैध साठ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nevasa Crime: ४०१ गोण्या रेशनच्या धान्याची गैरकायदेशीररीत्या विक्री, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा.
नेवासा: नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे नागरिकांनी पकडून दिलेल्या अवैधरित्या साठवणूक केलेल्या रेशनच्या धान्य साठ्याबाबत काल नेवासा पोलीस ठाण्यात महिला पुरवठा निरीक्षकाच्या फिर्यादीवरुन सुमारे 401 गोण्या रेशनच्या धान्याची गैरकायदेशीरित्या विक्री केली व ते साठवून ठेवले याबद्दल तिघांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या गहू व तांदळाचा साठा शुक्रवारी नागरिकांनी पकडला. शनिवारी दुपारी नेवासा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक वैशाली विजयकुमार गंदीगुडे (वय 36) यांनी फिर्याद दिल्यावरुन सुरेश दगडू उभेदळ रा. सुरेशनगर ता. नेवासा, किशोर ऊर्फ संतोष सुदाम गोरे रा. सुरेशनगर ता. नेवासा व संदीप सुभाष शिंदे रा. भानसहिवरे ता. नेवासा या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीनुसार, आरोपी सुरेश दगडू उभेदळ याने टेम्पोचालकास अपप्रेरणा देवून व स्वस्त धान्य दुकानाचा माल असल्याचे माहित असताना केवळ धान्य पोहचवण्याकरीता वाहन पुरविण्याचा ठेका असल्याचा गैरफायदा घेवून शासकीय गोदामातील रेशननिंगच्या गव्हाचा तसेच तांदळाचा साठा त्यामध्ये 1 लाख 42 हजार 800 रुपये किंमतीच्या गव्हाच्या 50 किलो वजनाच्या 119 गोण्या (प्रतिगोणी 1200 रुपये) असा गहू ज्यामध्ये दोन गोण्या शासकीय प्लॅस्टीकच्या बारदाण्यामध्ये.
2 लाख 82 हजार रुपये किंमतीच्या तांदळाच्या 282 गोण्या (प्रतिगोणी 1000 रुपये) त्यामध्ये 16 गोण्या शासकीय खाकी बारदाण्यामध्ये 1200 रुपये किंमतीचा शासकीय खाकी रंगांचे 100 बारदाणे (गोण्या), 3 हजार 800 रुपये किंमीचे 282 शासकीय प्लॅस्टीकचे बारदाणे. तसेच दहा लाख रुपये किनमतीचा टाटा आयशर ट्रक (एमएच 04 सीए 9291). असा एकूण 14 लाख 69 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी आयशर ट्रकचा चालक किशोर ऊर्फ संतोष सुदाम गोरे (वय 29) रा. सुरेशनगर ता. नेवासा याचे मार्फतीने आरोपी संदीप सुभाष शिंदे (रा. भानसहिवरे ता. नेवासा) याला विक्री केला. तसेच रोपी संदीप सुभाष शिंदे याने सदरचा जप्त केलेला मुद्देमाल हा शासकीय रेशनिंगचा असल्याचे माहिती असूनही त्याने त्याचा गैरकायदेशीरपणे व्यापा रव करण्यासाठी विकत घेतला.
या फिर्यादीवरुन वरील तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 904/2022 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3,6 (क), 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी भेट देवून सदर साठ्याची पाहणी केली.
Web Title: Crime registered against three in connection with illegal stocking of rationing