Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचे अपहरण एका संशयितावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण एका संशयितावर गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar: वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणी दि. १३ मार्च रोजी मध्यरात्री तिच्या घरातून अचानकपणे बेपत्ता.

Crime has been registered against a suspect for the kidnapping of a minor girl

राहुरी: राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातून एक १७ वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणी दि. १३ मार्च रोजी मध्यरात्री तिच्या घरातून अचानकपणे बेपत्ता झाली. पीडित मुलीचे अपहरण केल्याच्या संशयावरून अमोल बाचकर याच्यावर संशयित आरोपी म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही राहुरी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अमोल सखाराम बाचकर दि. १३ मार्च रोजी पीडित मुलीला महाविद्यालय परिसरात भेटला आणि तू माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर, माझ्याबरोबर पळून चल, असे म्हणाला, तेव्हा या तरुणीने त्यास नकार दिला. तेव्हा त्याने ‘तू जर माझ्या बरोबर आली नाही, तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याबाबत सदर तरुणीने तिच्या आईला माहिती दिली होती. त्यानंतर ही तरुणी तिच्या घरात झोपलेली असताना मध्यरात्री १२ वाजे दरम्यान घरात कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली. नातेवाईकांनी तरुणीचा परीसरात शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. आरोपी अमोल बाचकर यानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय नातेवाईकांना आला. याप्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल सखाराम बाचकर रा. राहुरी कॉलेज, याच्यावर भा. दं. वि. कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी अमोल बाचकर हा पसार झाला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलीस शिपाई गणेश सानप करीत आहेत.

Web Title: Crime has been registered against a suspect for the kidnapping of a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here