व्यापार्याच्या डोक्यात कोयत्याने वार करत खूनी हल्ला
Ahmednagar Crime News Live | अहमदनगर: सावेडी उपनगराच्या भिस्तबाग चौकातील गजराज ड्रायक्लीन फॅक्टरीसमोर पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून तरूण व्यापार्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
व्यापारी सागर नवनाथ शेडाळे (वय 26 रा. तुळजाभवानी मंदिराजवळ, पाईपलाईन रोड, सावेडी) यांच्यावर हल्ला केल्याने हे जखमी झाले आहेत.
व्यापारी सागर यानी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारा अक्षय नवनाथ खटावकर (रा. भिस्तबाग महालाजवळ, सावेडी) याच्याविरूध्द भादंवि कलम 307, 323, 341, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास व्यापारी सागर शेडाळे त्यांच्या दुचाकीवरून भिस्तबाग महाल ते भिस्तबाग चौक रोडने जात असताना गजराज ड्रायक्लीन फॅक्टरीसमोर अक्षय खटावकर याने त्याची दुचाकी शेडाळे यांच्या दुचाकीला आडवी लावली. पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून शिवीगाळ करून दगड फेकुन मारण्यास सुरूवात केली. तु मला पैसे देत नाही, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केला.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी भेट दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर करत आहे.
Web Title: Crime Filed Killer attack with a scythe in the merchant’s head